दुष्काळग्रस्त भागांचा पंचनामा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; पिकांची छायाचित्रे आणि GPS लोकेशनही घेणार
मुंबई : महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्यानंतर आता शासनाने प्रत्यक्ष नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळग्रस्त भागांमध्ये तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पावसातील तूट आणि पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिकांवर परिणाम झालेल्या भागांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा अहवाल तयार केला जाणार …