फुले विद्यालयाच्या पाच खेळाडूंची राज्य, विभागीय स्पर्धांसाठी निवडकुस्ती, लॉन टेनिससह धावणे, गोळाफेक व थाळीफेकीत उल्लेखनीय कामगिरी

October 13, 2026 11:57 AM

Join WhatsApp

Join Now

गोकुंदा, किनवट : महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा, किनवट या विद्यालयाच्या खेळाडूंनी शालेय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे. विविध क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या पाच खेळाडूंनी राज्य व विभागस्तरीय स्पर्धांसाठी पात्रता मिळवली आहे.इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकणारी कु. लक्ष्मी मच्छिंद्र कुर्रे हिची कुस्ती स्पर्धेत राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील आदित्य सिंग हरिसिंग चव्हाण याची लॉन टेनिस शालेय स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील तुषार तुळसीदास जांभळे याने १९ वर्षांखालील गटातील १०० मीटर धावणे या प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. त्याचप्रमाणे इयत्ता आठवीतील कु. त्रिशा अरविंद केंद्रे हिची गोळाफेक या क्रीडा प्रकारात विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. इयत्ता आठवीतील कु. वेदिका प्रफुल राठोड हिने थाळीफेक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.या सर्व खेळाडूंच्या यशामुळे महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदाचे नाव तालुक्यासह जिल्ह्यातही उज्ज्वल झाले आहे. खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.या यशाबद्दल संस्थेचे सचिव माननीय अभियंता श्री. प्रशांतजी ठमके साहेब, संस्थेच्या कोषाध्यक्षा व महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदाच्या प्राचार्या शुभांगीताई प्रशांत ठमके, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्याम जाधव सर, पर्यवेक्षक संतोष बैसठाकूर सर, रघुनाथ इंगळे सर, माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक किशोर डांगे सर, पर्यवेक्षक एम. पी. मुनेश्वर सर, खोब्रागडे सर, भोयर सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडू आणि क्रीडा शिक्षक प्रेम तांदळे सर यांचे अभिनंदन केले.यावेळी सर्व यशस्वी खेळाडूंना आगामी राज्य व विभागस्तरीय स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. खेळाडूंच्या या यशामुळे गोकुंदा परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Leave a Comment